April 21, 2024

कसे मिळणार 1500 रुपये रिक्षाचालकांना? जाणून घ्या

विलेपार्ले- सध्याच्या कोविड-१९ साथीच्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्षा परवानाधारकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५०० रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.

सदर पॅकेजची रक्कम परवानाधारक ऑटो रिक्षा चालकांन पर्यंत पोहचविण्या करीता जो ऑनलाईन फॉर्म भरला जातो, तो भरण्याचे काम सुरु केले आहे.

आपणांस किंवा आपल्या परीचयात असलेल्या एखाद्या गरजू परवानाधारक ऑटो रिक्षा चालकास सदर फॉर्म भरण्याकरीता संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आवाहन विलेपार्ल्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेश सावंत यांनी केले आहे. कोणाला काही अडचण आल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. राजेश प्रकाश सावंत- ९९६७५५५०९८

अर्जासाठी आवश्यक तपशील खालीलप्रमाणे:

मोबाईल क्रमांक

आपले वाहन क्रमांक,

ड्रायव्हिंग लायसन्स,

परमिट 

आधार क्रमांक