April 21, 2024

श्वेता बच्चन पहिल्यांदाच दिसली जाहिरातीत

मुंबई- महानायक अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चन आतापर्यंत रुपेरी पडद्यापासून दूर होती. मात्र पहिल्यांदाच ती एका जाहिरातीत दिसली. ही जाहिरात सामाजिक संदेश देणारी आहे. विशेष म्हणजे श्वेता आपल्या पित्यासोबत, अमिताभ बच्चन यांच्यासोबत या जाहिरातीत दिसते.

अमिताभ बच्चन यांनी या जाहिरातीत पेन्शनधारकाची भूमिका केली असून त्यांची कन्या श्वेता बच्चन त्यांना घेऊन पेन्शनच्या कार्यालयात येते. सरकारी खात्याचा या वेळी या बापलेकीला प्रत्यय येतो. या टेबलवरुन त्या टेबलवर फिरत अखेरीस ते दोघे मॅनेजरच्या केबिन मध्ये पोहोचतात. त्यानंतरचा प्रसंग खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. एका छोट्या प्रसंगातून खूप मोठा संदेश ही जाहिरात देते. एकदा तरी ही जाहिरात नक्की पहा.