June 13, 2024

मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई- मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. समुद्राला भरती सायंकाळी ०७ : ०४ वाजता ३.४८ मीटर असेल तर ओहोटी रात्री ०१ :५७ वाजता – १.३३ मीटर एवढी असेल. नागरिकांनी वातावरणाचा अंदाज घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.

दरम्यान काल (२७.०६.२०२३) सकाळी ८ ते आज (२८.०६.२०२३) सकाळी ८ या कालावधीत मुंबई शहरात ०७ मिमी, पूर्व उपनगरात २८ मिमी, पश्चिम उपनगरात २९ मिमी पावसाची नोंद झाली.