June 12, 2024

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 साठी मागवली नामांकने

नवी दिल्‍ली, 26 जून 2023

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 साठी नामांकने मागवली आहेत. केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने साहसी क्षेत्राशी निगडित व्यक्तींच्या कामगिरीची ओळख सर्वांना व्हावी तसेच चिकाटी, जोखीम पत्करण्याची, सांघिक सहकार्याची भावना आणि आव्हानात्मक परिस्थितीत जलद, तत्पर  आणि प्रभावी पाऊले उचलण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी  “तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस  पुरस्कार प्रदान केले जातात.

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 साठी नामांकन https://awards.gov.in या पोर्टलद्वारे 15 जून 2023 ते 14 जुलै 2023 या कालावधीत मागवण्यात येत आहेत. पुरस्कारासाठी मार्गदर्शक तत्त्वे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर पुढील  URL https://yas.nic.in/youth-affairs/inviting-nominations-tenzing-norgay-national-adventure-award-2022-15th-june-2023-14th वर उपलब्ध आहेत. उत्कृष्ट कामगिरी आणि नेतृत्वाचे उल्लेखनीय गुण, साहसी भावना आणि जमीन, हवा किंवा पाणी (समुद्र) या सारख्या साहसाच्या एका विशिष्ट क्षेत्रात सातत्याने कामगिरी बजावणारी  कोणतीही व्यक्ती  अंतिम तारखेपूर्वी म्हणजेच 14 जुलै 2023 पूर्वी वरील पोर्टलद्वारे पुरस्कारासाठी अर्ज करू शकते.

कांस्य पदक, प्रमाणपत्र, रेशमी टायसह ब्लेझर/साडी आणि  15 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारत सरकारतर्फे अर्जुन पुरस्कारांबरोबर  विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान केले जातात.

साधरणपणे लँड ऍडव्हेंचर (जमीन), वॉटर ऍडव्हेंचर (समुद्र) आणि एअर ऍडव्हेंचर (हवाई) मधील साहसी कामगिरी आणि जमीन, समुद्र, हवाई क्षेत्रातील साहसी कामगिरीसाठी जीवन गौरव  अशा चार श्रेणींमध्ये एक पुरस्कार दिला जातो. लँड ऍडव्हेंचर, वॉटर ऍडव्हेंचर आणि एअर ऍडव्हेंचर  या 3 श्रेणींसाठी गेल्या 3 वर्षातील कामगिरीचा तर जीवनगौरव पुरस्कारासाठी संपूर्ण कारकीर्दीतील कामगिरीचा विचार केला जातो.