June 12, 2024

एखाद्या मुलीवर हल्ला होत असेल तर तात्काळ मदतीला धावून जाण्याचा राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिकांना आदेश

मुंबई- काल पुण्यात एका मुलीवर कोयता हल्ला झाला. या हल्ल्यात लेशपाल जवळगे या तरुणाने प्रसंगावधान राखून हल्ला करणाऱ्या इसमाकडून कोयता हिसकावून तरुणीचे प्राण वाचविले. याचे कौतुक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले. अलीकडे तरुणींवर असे प्रसंग सर्रास ओढवत असल्याने सरकारने तातडीने पाऊले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. अशा प्रसंगी बघ्याची भूमिका घेणाऱ्या लोकांविषयी चिंता देखील व्यक्त केली.
असा प्रसंग जर आपल्या नजरेसमोर घडला तर महाराष्ट्र सैनिकांनी वेळीच धावून जावे असा आदेश देखील दिला.