February 22, 2024

मालपा डोंगरीतील घरगुती गणेश सजावट स्पर्धा – २०२३चा बक्षीस समारंभ संपन्न

अंधेरी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गणेशोत्सवानिमित्त मालपा डोंगरी नं २ विभागातील गणेश भक्तांसाठी ” घरगुती गणेश सजावट स्पर्धा – २०२३ ” चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ शनिवार दि. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी शिवसेना शाखा क्र ७९ येथे विविध मान्यवरांच्या हस्ते‌ करण्यात आला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक सचिन बोबले यांच्या निसर्ग रम्य देखावा असलेल्या सजावटीने पटकावला. द्वितीय क्रमांक मंगेश ठिक यांच्या संत महात्मांच्या देखाव्याने तर तृतीय क्रमांक अशोक कुलये यांच्या समुद्र मंथन चलचित्राने पटकावला. उत्तेजनार्थ क्रमांकासाठी नितीन लाखन यांच्या चांद्रयान मोहिमची निवड झाली तर अनुराग गुरव यांच्या बाप्पांची मूर्ती `आकर्षक मुर्ती’ ठरली. पावनखिंड चलचित्र व कागदी मुर्ती अशी ऐतिहासिक व पर्यावरणपूरक सांगड घालणाऱ्या रुपेश बंगालेच्या बाप्पाला विशेष पुरस्कार मिळणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांचा आकर्षक चषक व प्रशस्तीपत्रक प्रदान करत सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे परिक्षकाची जबाबदारी पार पाडणारे वैभव पवार व मनिष पेंडूरकर‌ यांचा देखील आयोजकांमार्फत मानचिन्हाने गौरव करण्यात आला. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार‌‌ लावणारे प्रदिप दुबे, संजय सालकर‌, लवू गुरव‌ व योगेश वालम यांचा देखील मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी नगरसेवक /भा.का.से.चिटणीस शैलेश परब, शाखासमन्वयक मधुकर जुवाटकर, कार्यालय प्रमुख सुभाष ( बाळा‌ ) नाईक, युवासेना उपविभाग अधिकारी अमोल भिंगार्डे, युवतीसेना उपविभाग अधिकारी अश्विनी वेर्लेकर, या कार्यक्रमाची संकल्पना श्रद्धा कृणाल‌ नाईक ( युवती शाखासमन्वयक – ८१ ) यांची होती. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष जय महाराष्ट्र क्रिडा/ उपाध्यक्ष भारतीय मराठा महासंघ वॉर्ड क्र ७९ कृणाल रामचंद्र नाईक यांनी केले.