April 21, 2024

बाबा महाराजांच्या निधनाने संकर्षण झाला भावूक

मुंबई/[प्रतिनिधी : ज्येष्ठ निरुपणकार, कीर्तनकार , प्रवचनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने अभिनेता संकर्षण कऱ्हाडे भावूक झाला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर बाबा महाराजांच्या आठवणी सांगणारी एक भावुक पोस्ट लिहिली आहे. काय लिहिले आहे या पोस्टमध्ये…..

“बाबा महाराज सातारकर 🙏🏻 फार
वाटायचं कधीतरी तुमच्या समोर बसुन , प्रत्यक्ष तुम्हाला पहात , तुमचा अभंग , किर्तन , प्रवचन ऐकावं.. आता ती संधी नाही…. गळा भरून भरून आलाय ..
बाबा महाराजांनी मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या आवाजानी , स्वरांनी, श्रवणाने वारकरी केलंय ..
आज ते आपल्यातनं गेले पण मी तरी ह्या जगांत आहे तोवर रोजची सकाळ त्यांच्या आवाजातल्या हरिपाठानेच सुरू करीन !
आज बाबा महाराजांना भेटून साक्षात परमेश्वर पण त्यांच्याच आवाजांत ऐकुन पाठ केलेला अभंग म्हणत असेल ; .
“धन्य आजी दिन संत दर्शनाचा , अनंता जन्मीचा शीण गेला” 🙏🏻

संकर्षण कऱ्हाडे आणि एकादशीची कविता .. संकर्षणची ही कविता डोळ्यांतून पाणी आणणारी तर आहेच. पण या कवितेमध्ये बाबा महाराजांचा उल्लेखही आहे.