April 21, 2024

बहुप्रतिक्षित ‘श्यामची आई’ दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमागृहांत

बहुचार्चित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा टिजर पाहिलात का? अर्थात हा टिजर समस्त प्रेक्षक वर्गाला चकित करून सोडणार हे मात्र नक्की.. तुम्हाला कृष्णधवल चित्रपटांच्या गोल्डन एरात आमचा खोडकर श्याम आणि त्याची मायेनं शिस्त लावणारी आई घेऊन जाणार आहेत. चित्रपटाचा टीजर पहिलात तर कैक वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर तंतोतंत उभा राहील. चित्रपटातील कलाकारांचे लूक्स, सेट, संवाद ते अगदी संगीत अशा साऱ्या गोष्टींना गोल्डन टच दिलेला पदोपदी जाणवेल. तेंव्हा तयार रहा, दिवाळीच्या मुहूर्तावर १० नोव्हेंबर,२०२३ रोजी कृष्णधवल पटाचा पुन्हा एकदा एक ऐतिहासिक अनुभव घ्यायला.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाचा टिजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा टिजर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता मात्र जोरदार वाढली आहे. बहुचर्चित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे तर सुपरहिट ‘पावनखिंड’ चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब , अजय , अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर , आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत. यंदा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे १० नोव्हेंबर,२०२३ रोजी ‘श्यामची आई’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत ‘श्यामची आई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु झाली. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.

‘श्यामची आई’ या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे ,गंधार जोशी, अनिकेत सागवेकर ही मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.