मुंबई/प्रतिनिधी : जलवाहिनीची जोडणी, स्ट्रक्चरल ऑडिट, महाकाली गुंफा मार्गावरील रम्य जीवन हाऊसिंग सोसायटीजवळ व कार्डिनल ग्रेसियस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व) येथे नवीन १ हजार ५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी आणि तसेच १ हजार २०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी (वर्सोवा आऊटलेट) जोडण्याचे काम वेरावली जलाशय १ व २ चे संरचना काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व व पश्चिम गोरेगाव परिसरातील पाणीपुरवठा मंगळवारी (३१ ऑक्टोबर २०२३ ) सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत १५ तासांसाठी बंद राहणार आहे. तरी या भागातील नागरिकांनी आदल्या दिवशी पाण्याचा साठा करून पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.
इथे पाणीपुरवठा बंद
अंधेरी पूर्व – त्रिपाठी नगर, मुंशी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व), सारीपुत नगर, दुर्गा नगर, जोगेश्वरी (पूर्व), दत्त टेकडी, ओबेरॉय स्प्लेंडर, केल्टी पाडा, गणेश मंदीर (जे.व्ही.एल.आर.) जवळचा परिसर, बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर, बांद्रा प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी, मेघवाडी, पंप हाऊस, विजय राऊत रस्ता, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, सर्वोदय नगर, कोकण नगर, विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण पंथी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले मार्ग, साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान मार्ग, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, • आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्ले पूर्व, अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, भगत सिंग व चरत सिंग वसाहत, अंधेरी पूर्व, जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग रस्ता, निकोलसवाडी परिसर.
अंधेरी पश्चिम – जोगेश्वरी स्थानक मार्ग, एस. व्ही. मार्ग, साब्री मशीद ते जेव्हीएलआर जंक्शन, मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व), यादव नगर, कॅ. सावंत मार्ग, जोगेश्वरी स्थानक मार्ग, सहकार मार्ग, बांदिवली हिल.
पाणीपुरवठा वेळेत बदल
अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. मार्ग, व्ही. पी. मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्थानक मार्ग या परिसरात सध्या दररोज पहाटे ३.३० ते सकाळी ८.३० या वेळेत पाणीपुरवठा केला जातो. मात्र जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात १ नोव्हेंबरपासून सकाळी ७.३० ते दुपारी १२.५० यावेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे. या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.
येथे कमी दाबाने पाणीपुरवठा
गोरेगाव – राम मंदिर, गोरेगाव पश्चिम (पाणीपुरवठा बंद) आणि बिंबीसारनगर (कमी दाबाने पाणीपुरवठा)
More Stories
देहव्यापारासाठी अल्पवयीन मुलींचा वापर करणाऱ्या मरोळमधील हॉटेलवर पोलिसांची धाड
कचऱ्या संबंधी सगळ्या तक्रारींचे निवारण हा महापालिकेचा दावा खोटा असल्याचा अंधेरीतील सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप
सीप्झ येथील जलवाहिनी गळती प्रकरणी कंत्राटदाराला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड