December 9, 2023

अंधेरीतील 19 वर्षांच्या डेरिकचा मैत्रिणीला वाचविताना गोव्यात बुडून मृत्यू

अंधेरी- अंधेरी (Andheri)येथील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय डेरिक राज याचा गोव्यातील (Goa) शिरवेन-चिंबेल येथील दगडाच्या पडीक खाणीत बुडून मृत्यू झाला.

डेरिक आणि सात मित्र बाहेर फिरायला गेले होते तेव्हा त्यांच्या गटातील एक मुलगी खोल पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात डेरिक आणि त्याचा मित्र अबनेर यांनी खाणीत उडी घेतली. अबनेर आणि मुलगी सुरक्षित पोहण्यात यशस्वी झाले, परंतु डेरिकला बाहेर पडता आले नाही, असे ओ हेराल्डोच्या वृत्तात म्हटले आहे.

रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संबंधित मित्रांनी गोवा अग्निशमन दलाला(Goa fire brigade) फोन केला. स्टेशन अग्निशमन अधिकारी गणेश गोवेकर आणि त्यांच्या टीमने प्रयत्न करूनही डेरिक सापडला नाही. अंधारामुळे त्यांना शोध पुढे ढकलणे भाग पडले.

खासगी गोताखोरांना सोमवारी त्याचा मृतदेह सापडला. जुने गोवा पोलिसांनी अशा खाणीचा धोका अधोरेखित केला होता. अशा दुर्घटना टाळण्यासाठी कुंपण घालण्याच्या गरजेवर पोलिसांनी भर दिला. डेरिक हा आपल्या चुलत भावासोबत गोव्यात सुट्टीवर गेला होता. सोमवारी संध्याकाळी ते मुंबईला परतणार होते.

Photo courtesy- herald goa

%d