May 25, 2024

बीएमसीच्या माजी कर्मचाऱ्याची ९६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी भाच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई: अंधेरीतील (Andheri) एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police station) गुरुवारी एका ४० वर्षीय व्यक्तीवर त्याचा मामा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) माजी कर्मचारी येशुरत्न जंगम यांची ९६ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

फिर्यादी येशुरत्न जंगम यांनी सांगितले की त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने जोशुआ नावाच्या एका मुलाला दत्तक घेतले होते, परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांचे संबंध बिघडले होते. त्यांच्या पत्नीचे कोविड-19(Covid 19) साथीच्या आजारादरम्यान निधन झाले आणि त्यांच्यात आणि त्यांच्या मुलामध्ये भांडणे सुरू झाली, तेव्हा फिर्यादी जंगम सायन कोळीवाड्यातील 40 वर्षीय भाचा जेकब मदारीच्या घरी गेले, असे हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

मदारीने जंगममध्ये एक भीती निर्माण केली की त्यांचा दत्तक मुलगा जंगमची काळजी घेईल परंतु त्यांची सर्व संपत्ती काढून घेईल आणि त्यांना सोडून देईल. मदारीने 75 वर्षीय जंगम यांना आश्वासन दिले की तो त्यांचे आर्थिक व्यवहार नीट बघेल. अनेक बँक खाती असतील तर आयकर विभाग चौकशी करेल अशी भीती घालत मदारीने जंगम यांचे सर्व पैसे एका बँक खात्यात जमा करण्यास उद्युक्त केले.

जंगम यांनी त्यांच्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, त्यांना त्यांचे सर्व पैसे एकाच खात्यात ट्रान्सफर करण्याचे आमिष दाखवण्यात आले. जंगम यांनी आपल्या भाच्याच्या बाजूने पॉवर ऑफ अॅटर्नी देखील बजावली, कारण त्यांना कोणत्याही चुकीच्या कृतीची अपेक्षा नव्हती.

दरम्यान जंगमचा मुलगा जोशुआ दिवाळीच्या आधी पडला आणि जखमी झाला. जंगमने मदारीकडे जोशुआला इस्पितळात दाखल करण्यासाठी पैसे मागितले, तेव्हा मदारीने पैसे काढू देण्यास नकार दिला आणि जंगम यांना घरातच बंदिस्त राहण्यास सांगितले. तेव्हा मदारीने आपली फसवणूक केल्याचे जंगम यांच्या लक्षात आले आणि त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड म्हणाले, “फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही तक्रारीची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि या खात्यातून काही व्यवहार झाले आहेत का ते शोधत आहोत.”