May 18, 2024

अंधेरीत आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद

मुंबई/प्रतिनिधी : जनतेला उत्तम दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी क्षत्रिय मराठा समाज आणि मीरा-भाईंदरच्या फॅमिली केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी ४ नोव्हेंबर २०२३ ला मरोळ पश्चिम येथे भरलेल्या आरोग्य शिबिरात २५० पेक्षा जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. त्यापैकी ७० नागरिकांनी मफत ईसीजी सेवेचा लाभ घेतला. तर १० नागरिकांना आँजिओग्राफी करण्यासाठी फॅमिली केअर हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले. सकाळी १०.०० वाजता सुरू झालेल्या या आरोग्य शिबिरास स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

एक मराठा लाख मराठा कोर समितीची अध्यक्ष अशोक देसाई, क्षत्रिय मराठा परिवाराचे राष्ट्रीय उपप्रमुख भारत पिसाळ, क्षत्रिय मराठा परिवाराचे अंधेरी विधांनसभा संघटक प्रवीण ताम्हणकर, अंधेंरी विधानसभा समन्वयक मोहन कांगणे , प्रभाग क्रमांक ८६ च्या महिला प्रमुख प्रिया ताम्ह्नणकर यांच्या पाठबळामुळे शिबीर भरविले गेले. तर क्षत्रिय मराठा परिवाराचे राष्ट्रीय सचिव प्रशांत पवार, प्रवक्ते दिलीप तावडे, अमोल जाधव, ऍड. लक्ष्मी पल्ली, विलास दळवी, अंधेरी विभागातील सुधीर परब, विजय राय , संदीप पवार, बाबू अल्ल्ले, युसूफ शाह आणि युनूस शाह यांचे सदर शिबीर भरविण्यासाठी सहकार्य लाभले.