December 9, 2023

महाराष्ट्र शासनाने जाहीर केली शासकीय सुट्ट्यांची यादी

मुंबई- नोकरीवर जाणार कोणताही चाकरमानी असो वा शाळेत जाणारा विद्यार्थी सर्वांनाच उत्सुकता असते ती सार्वजनिक सुट्ट्यांची. महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) 2023 ही वर्ष संपण्यासाठी अजून दोन महिने असताना सार्वजनिक सुट्ट्यांची (Public holidays) यादी जाहीर केली आहे. जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत.

महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत येणाऱ्या शाळा , महाविद्यालये तसेच बँका इतर शासकीय कार्यालये यांना राज्य शासनाला दिनांक 08 मे 1968 नुसार देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासन सदर अधिसूचनेद्वारे राज्यात सन 2024 सालासाठी नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर केलेल्या आहेत. या सुट्ट्यांच्या अनुषंगाने पुढील वर्षाच्या सुट्टीचे नियोजन करणे सुलभ होणार आहे. या सुट्ट्या पुढीलप्रमाणे –

जानेवारी ते जून दरम्यानच्या सुट्ट्या

सुट्टीचा दिवसदिनांकवार
प्रजासत्ताक दिन26 जानेवारीशुक्रवार
छत्रपती शिवाजी महाराज जयंती19 फुब्रुवारीसोमवार
महाशिवरात्री08 मार्चशुक्रवार
होळी25 मार्चसोमवार
गुड फ्रायडे29 मार्चशुक्रवार
गुढीपाडवा09 एप्रिलमंगळवार
रमझान11 एप्रिलगुरुवार
डॉ.बाबासाहेबर आंबेडकर जयंती14 एप्रिलरविवार
रामनवमी17 एप्रिलबुधवार
महाविर जन्म कल्याणक21 एप्रिलरविवार
महाराष्ट्र दिन01 मेबुधवार
बुद्ध पौर्णिमा23 मेगुरुवार
बकरी ईद17 जुनसोमवार

जुलै ते डिसेंबर दरम्यानच्या सुट्ट्या
सुट्टीचा दिवसदिनांकवार
मोहरम17 जुलैबुधवार
स्वातंत्र दिन15 ऑगस्टगुरुवार
पारशी नववर्ष15 ऑगस्टगुरुवार
गणेश चतुर्थी07 सप्टेंबरशनिवार
ईद-ए – मिलाद16 सप्टेंबरसोमवार
महात्मा गांधी जयंती02 ऑक्टोंबरबुधवार
दसरा12 ऑक्टोंबरशनिवार
दिवाळी अमावस्या ( लक्ष्मीपुजन )01 नोव्हेंबरशुक्रवार
दिवाळी ( बलिप्रतीपदा )02 नोव्हेंबरशनिवार
दिवाळी ( भाऊबीज )03 नोव्हेंबररविवार
गुरुनानक जयंती15 नोव्हेंबरशुक्रवार
ख्रिसमस25 डिसेंबरबुधवार
फक्त बँकाकरीता01 एप्रिलसोमवार

%d