February 22, 2024

पीएस फाउंडेशनने केली यूथ विंगच्या पदाधिकाऱ्यांची निवड

अंधेरी- माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि त्यांचे एनजीओ पीएस फाउंडेशन पुन्हा चर्चेत आले आहे. रविवारी, 26 नोव्हेंबर रोजी पीएस फाउंडेशनने एका बैठकीत एक घोषणा केली की त्यांची अंधेरी विधानसभा मंडळ अधिकृतपणे अंधेरी पूर्व येथे आहे. यावेळेस यूथ विंगच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

पीएस फाउंडेशनच्या सदस्यांना संबोधित करताना प्रदीप शर्मा म्हणाले की पीएस फाऊंडेशनचा मुख्य हेतू महिला सक्षमीकरणाला पाठिंबा देणे आणि लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण करणे हा आहे.

पुढे माजी अधिकारी शर्मा म्हणाले की संसदेने आधीच ५० टक्के महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर केले आहे आणि त्यामुळे अधिकाधिक महिलांनी येऊन राजकारण स्वीकारले पाहिजे. महिलांना आधार देणे आणि न्याय मिळवणे हे पीएस फाउंडेशनचे प्राधान्य आहे.

संपूर्ण कार्यक्रमादरम्यान, प्रदीप शर्मा आणि पी एस फाऊंडेशन महिला विभागाच्या प्रमुख स्विकृती शर्मा यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पीएस फाऊंडेशनने आपल्या टीमसह २६/११ च्या मुंबई दहशतवादी पीडितांना श्रद्धांजली वाहिली.