स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना दिला दिवाळीचा फराळ अन भेटवस्तू
अंधेरी: अंधेरी (पूर्व) पारसी वाडा(Parsiwada crematorium) येथील स्मशानभूमी अंधेरीतील(Andheri) एक स्वच्छ स्मशानभूमी म्हणून ओळखली जाते. वर्षातील ३६५ दिवस 24 तास अंत्यविधीसाठी सदैव तत्पर असणा-या कर्मचाऱ्यांची दिवाळी (Diwali) गोड व्हावी या उदात्त हेतूने शिवसेना उदधव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विलेपार्ले विधानसभेने त्यांना फराळ, मिठाई आणि भेटवस्तूचे वाटप करून त्यांची दिवाळी साजरी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विलेपार्ले स्मशानभूमीत विलेपार्ले विधानसभेचे समन्वयक नितीन डिचोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारशीवाडा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. “येथील सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमची दिवाळी खऱ्या अर्थाने आणखी गोड झाली,” असे नितीन डिचोलकर म्हणाले.
आपल्या कामाची दखल घेऊन भेटवस्तू व फराळ देऊन तोंड गोड केल्याबद्दल स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे आभार मानले.
image source – proiqra.com
More Stories
देहव्यापारासाठी अल्पवयीन मुलींचा वापर करणाऱ्या मरोळमधील हॉटेलवर पोलिसांची धाड
कचऱ्या संबंधी सगळ्या तक्रारींचे निवारण हा महापालिकेचा दावा खोटा असल्याचा अंधेरीतील सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप
सीप्झ येथील जलवाहिनी गळती प्रकरणी कंत्राटदाराला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड