February 22, 2024

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अंधेरीत होणार सुगंधी उटण्यांचे वाटप

अंधेरी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातर्फे दिपावली निमित्त विभागातील नागरिकांसाठी ” सुगंधी उटणे‌ ” वाटप करण्यात येणार आहे. याचे अनावरण अंधेरी पूर्व (Andheri)विधानसभा श्रेत्राच्या आमदार ऋतुजा रमेश लटके(MLA Rutuja Latke) तसेच माजी नगरसेवक शैलेश परब‌ व माजी नगरसेविका शिवानी शैलेश परब यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी गटप्रमुख मनिष पेंडूरकर, लवू गुरव, जय डिगे, संजय साळकर व तांबे उपस्थित होते. जय महाराष्ट्र क्रिडा मंडळाचे अध्यक्ष कृणाल रामचंद्र नाईक व प्रभाग क्र. ८१च्या युवती शाखासमन्वयक श्रद्धा कृणाल नाईक यांची ही सुगंधी उटणे वाटप संकल्पना आहे.