मुंबई/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून के-पूर्व प्रभाग कार्यालयातील नागरीक अटीतटीच्या पाणीटंचाईला समोरे जात आहेत. त्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाणी टंचाईवर महापालिकेच्या के-पूर्व प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. या धडक मोर्च्यात पाणीबाणीच्या मुद्यावरून संतप्त नागरीकही सामील झाले होते.
जानेवारी २०२३ पासून के-पूर्व प्रभागातील नागरीक पाणी टंचाईला सामोरे जात आहेत. त्यासाठी काढलेल्या मोर्चाचे आयोजक आणि के-पूर्व भागातील शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे विधानसभा संघटक प्रमोद सावंत सांगतात, “के-पूर्व भागात पाण्याचा प्रश्न इतका गंभीर नव्हता. जो जानेवारी २०२३ पासून झालेला आहे. या भागात पूर्वी चार तास पाणी येत असे… त्या पाण्याच्या वेळेत कपात करून दोन ते अडीच तास पाणी सोडले जातेय. या वेळेतही पाणी आले तर येते. या पाण्याला प्रेशर नसतो. या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी या मोर्च्याचे आयोजन केले आहे.” प्रशासनाने यावर जर काही थेट कार्यवाही केली नाही तर या आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र करू असा इशारा प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

More Stories
देहव्यापारासाठी अल्पवयीन मुलींचा वापर करणाऱ्या मरोळमधील हॉटेलवर पोलिसांची धाड
कचऱ्या संबंधी सगळ्या तक्रारींचे निवारण हा महापालिकेचा दावा खोटा असल्याचा अंधेरीतील सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप
सीप्झ येथील जलवाहिनी गळती प्रकरणी कंत्राटदाराला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड