February 22, 2024

विवा “एक्सप्रेशन सिनेफ्लेक्स”चा धमाका, स्पर्धेत वरचढ ठरल्या जाहिराती

विरार – आपल्या सर्वांच्या दिवसांची सुरुवात आणि शेवट जाहिरातीने होत असते. आपण दिवसभर वेगवेगळ्या ब्रँडच्या घोळक्यात फिरत असतो. जाहिराती, माध्यमे व ब्रँड्स यांच्या शिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे असे म्हणायला हरकत नाही. जाहिरातीच्या माध्यमातून आपण उत्पादनाची खरेदी विक्री करत असतो. माध्यमांच्या विद्यार्थांना तर जाहिराती हा अभ्यासातील अमुलाग्र भाग मानला जातो म्हणूनच दरवर्षी विरार(Virar) येथील विवा महाविद्यालयात(Viva college) बीएएमएमसी(BAMMC) विभागातर्फे ‘एक्सप्रेशन’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा एक्सप्रेशनचे १८ वे वर्ष असून यावेळी “सिनेफ्लेक्स” ही थीम निवडण्यात आली होती. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यंदा चित्रपटातील संवाद, पात्र आणि जाहिराती प्रकार यांचा वापर करून जाहिराती बनवायच्या होत्या. या कार्यक्रमामध्ये माध्यमांचा अप्रतिम मेळ पाहायला मिळाला. प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन कमर्शिअल, रेडिओ जिंगल्स, फोटोग्राफी, कविता, रिल, इत्यादी स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या.

या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार श्री. शिखर हितेंद्र ठाकूर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला सरोजकुमार रॉड्रिक्स, राष्ट्रपाल काकडे, जयराज सोलंकी, हर्षवर्धिनी बोरवणकर परीक्षक म्हणून लाभले. बीएएमएमसी विभागाचे सहा. प्राध्यापक मोहसीन शेख व सहा. प्राध्यापक प्रविण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. विभागाच्या प्रमुख शाहीन महिडा यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.

विद्यार्थ्यांनी उत्पादन ब्रँड आणि सिनेमाबद्दल अप्रतिम जाहिराती तयार करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध विभागातील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्र ठाकूर, ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन.पाध्ये,विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी. एस. अडिगल, विवा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उप प्राचार्या डॉ. दिपा वर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.