May 25, 2024

मरोळमध्ये 18 लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त; एका महिलेसह तीन जण अटकेत

अंधेरी, 18 एप्रिल (पीटीआय)- मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) एका महिलेसह तीन जणांना दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 42 लाख रुपये किमतीच्या मेफेड्रॉनसह अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने बुधवारी अंधेरीतील मरोळ येथे एका महिलेसह दोन जणांना अटक केली. 18 लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त केले.

नागपाडा परिसरात अंमली पदार्थ विरोधी गस्त घालत असताना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 24 लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.