May 25, 2024

मुंबई युवक कॉँग्रेसचे अंधेरी पुलावर पोस्टरच्या माध्यमातून आंदोलन

अंधेरी- अंधेरीचा गोखले पूल सध्या त्याच्या उंची मुळे चर्चेत आहे. उंची मुळे बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांचा ताळमेळ बसत नसल्याने गोखले पूल पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. पुलाची ही गडबड भाजप सरकार मुळे झाली असा आरोप करत मुंबई युवक कॉँग्रेसने `हा माझा विकास’ आशयाची भित्तिपत्रके लावत आंदोलन केले.

मुंबई प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि कार्याध्यक्ष सुफियान हैदर यांच्या नेतृत्वाखाली युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे असलेले पोस्टर्स अंधेरी पश्चिमेच्या दिशेला असलेल्या बंद बॅरीकेड्स वर चिकटवले.