May 25, 2024

गोरेगाव पश्चिम येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

गोरेगाव – न्यु हनुमान नगर रहिवाशी संघ, एम.जी. रोड, गोरेगाव (प.) मुंबई -१०४ येथील बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र.४३४ तसेच भिमाई महिला मंडळ आणि धम्मदिप तरुण मंडळ यांच्या विद्यमाने महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ वा जयंती महोत्सव अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला.

यावेळी दिनेश लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तमी गमरे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले असून दिपप्रज्वालन वत्सला हळदे यांनी केले. सदर कार्यक्रमात माजी नगरसेवक समीर देसाई, नगर विकासक अजय विचारे, पंचायत समिती सरचिटणीस राजेश घाडगे, समाज सेवक सुशील चव्हाण, समाज सेविका लक्ष्मी भाटिया, माजी नगर सेविका लोचना चव्हाण, माजी गटप्रतिनिधी तुळशिराम शिर्के, बौध्द धम्माचे गाडे अभ्यासक के.जी .सुर्वे, नगर कमिटी अध्यक्ष यशवंत जाधव, समन्वय समिती कार्याध्यक्ष संदीप लाखन, समन्वय समिती सरचिटणीस शिवाजी मोहिते त्याचप्रमाणे उत्तम जाधव, पत्रकार मेघना सुर्वे आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी शाखेतील सभासदांना प्रा.प्रेमरत्न चौकेकर संपादित ‘दैनिक सार्वभौम राष्ट्र’ या दैनिकांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विशेषकांचे वाटप करण्यात आले. यावेळी भिमाई महिला मंडळ यांच्यातर्फे भोजनदान करण्यात आले होते.
सायंकाळी परिसरातील नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर सम्राट कांबळे यांची संकल्पना आणि निवेदन असलेला ‘बोधिसत्व भिमराया ‘ ( एक संगीतमय वाटचाल मनोरंजनातून प्रबोधनाकडे) हा संगीतमय कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वियज पवार, अनिल हळदे, रविंद्र गमरे, चंद्रमणी मोहिते,चंद्रकांत गायकवाड, मंगेश जाधव, तसेच भिमाई मंडळातील संगीता धोत्रे, भवती जाधव, मनिषा लोखंडे, रोशनी गमरे, सुप्रिया कदम, पद्ममीनी सुर्यवंशी, वंदना गायकवाड आणि पौणिमा सदामस्त आदी पदाधिकाऱ्यांनी , सदस्यांनी परिश्रम घेतले.