andheri east (1)

४५० रिक्षाचालकांवर दंड

मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात अंधेरी वाहतूक पोलिसांनी मंगळवारी विशेष कारवाई केली. या कारवाईदरम्यान विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे ४५० ऑटोरिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सकाळी लवकर सुरू झालेली ही कारवाई दुपारपर्यंत सुरू होती. अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे हा या मोहिमेचा उद्देश होता.

अंधेरी स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची आणि वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रिक्षा तसेच इतर वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि वाहतूक शिस्त कायम राहावी, यासाठी ही कारवाई करण्यात आली.

वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष मोहीम संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहे. स्थानक परिसरात ये-जा करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पुढील काळातही कारवाई केली जाणार आहे, असे मिड डे च्या वृत्तात म्हटले आहे.