MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS

आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहार १०० कोटींच्या टप्प्यावर; पाच महिन्यांत दुप्पट वाढ

मुंबई, दि.२० : ‘आधार’द्वारे सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधार संवाद या कार्यक्रमाला BFSI, फिनटेक आणि टेलिकॉम क्षेत्रातील ५०० हितधारक उपस्थित होते. या कार्यक्रमात आधारच्या विविध उपयोजनांवर चर्चा करण्यात आली.

फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांचा ऐतिहासिक उच्चांक

आधार(Aadhar) फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांनी १०० कोटींचा टप्पा ओलांडला, केवळ पाच महिन्यांत ५० कोटींवरून दुप्पट वाढ झाली. २०२१ मध्ये सुरू झालेली ही AI/ML आधारित प्रणाली विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षित आणि सुलभ ओळख पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे.

हितधारकांचा सहभाग : बँकिंग, एनबीएफसी, फिनटेक आणि टेलिकॉम क्षेत्रांतील तज्ज्ञांनी आधारच्या वापरासाठी चार पॅनल चर्चासत्रांमध्ये भाग घेतला. या सत्रांमध्ये आधारच्या माध्यमातून सेवा सुधारण्यासाठी उपाययोजना व धोरणांवर विचारमंथन करण्यात आले.

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील आधारची भूमिका : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी आधारच्या लोकसंख्याशास्त्रीय वापराबद्दल सांगताना ‘आधार’ने डिजिटल व्यवहारांवरील विश्वास वाढविण्यासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले.

फेस ऑथेंटिकेशनचा वापर: आधार फेस ऑथेंटिकेशन प्रणालीला सध्या ९२ सरकारी आणि खासगी संस्था वापरत आहेत. ही प्रणाली सुरक्षित, संपर्कविहीन आणि कुठेही, कधीही वापरण्यास सोयीस्कर आहे.

भविष्यातील उद्दिष्टे

UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी आधारद्वारे सेवा वितरण अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने UIDAI च्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या कार्यक्रमाने वित्त, दूरसंचार, फिनटेक आणि सार्वजनिक सेवांमध्ये आधारच्या वापराचा विस्तार करण्याचा उद्देश ठेवला आहे.

आधार संवाद कार्यक्रमाचा दुसरा टप्पा मुंबईत यशस्वीरित्या पार पडला. पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये बेंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आला होता.