Posts List

Posts Slider

Health

₹२५० कोटींचा मेट्रो प्रकल्प अडचणीत
₹२५० कोटींचा मेट्रो प्रकल्प अडचणीत

चूक दुरुस्त न झाल्यास जवळपास १ किमीचा उन्नतमार्ग पाडावा लागण्याची शक्यता

मुंबई : मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीवर दिलासा देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या मेट्रो ७ए प्रकल्पासमोर मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. विमानतळ परिसरातील उंचीच्या मर्यादांचा अंदाज बांधताना झालेल्या नियोजनातील त्रुटीमुळे विलेपार्ले पूर्व येथील जवळपास एक किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग (Elevated Viaduct) पाडून पुन्हा उभारण्याची वेळ येऊ शकते. तांत्रिक तोडगा निघाला नाही, तर या कामावर खर्च झालेली सुमारे ₹२५० कोटींची रक्कम पुन्हा खर्च करण्याची शक्यता आहे.

मेट्रो ७ए ही अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी ३.४ किमीची मेट्रो मार्गिका आहे. या मार्गाचा काही भाग भूमिगत तर सुमारे ९४० मीटरचा भाग उन्नत मार्गावर आहे. यामध्ये विलेपार्ले पूर्वेकडील एअरपोर्ट कॉलनी स्टेशन आणि त्याचा उन्नत मार्ग समाविष्ट आहे.

मात्र विमानतळाच्या ‘फनेल झोन’मध्ये मेट्रो मार्गाच्या उंचीवर एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) कडून विशिष्ट मर्यादा लागू आहेत. मेट्रोच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिकल उपकरणांसाठी आवश्यक असलेली अतिरिक्त उंची या मर्यादांमध्ये बसत नसल्याचे समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मेट्रोच्या प्रस्तावाला २०२२ मध्ये AAI कडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले होते. मात्र त्यानंतर ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशनसाठी आवश्यक असलेली अतिरिक्त उंची मूळ डिझाइनमध्ये विचारात घेतली गेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या तांत्रिक त्रुटीमुळे आवश्यक उंची आणि परवानगी असलेली उंची यांच्यात सुमारे २.५ मीटरचा फरक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भागातील काम सध्या थांबवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, व्हायाडक्टचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही समस्या समोर आली.

२०२५ मध्ये उंचीचा हा प्रश्न निदर्शनास आल्यानंतर बांधकाम थांबवण्यात आले आणि सुधारित परवानगीसाठी AAI कडे प्रस्ताव पाठवण्यात आला.

MMRDA आणि संबंधित तज्ज्ञांकडून या समस्येवर तांत्रिक तोडगा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हा तोडगा निघाला नाही, तर बांधलेला व्हायाडक्ट पाडून त्याची पुनर्बांधणी करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकल्पासाठी नागरी बांधकामाचे सल्लागार म्हणून Systra, CEG आणि SMCIPL यांच्या कन्सोर्टियमची नियुक्ती करण्यात आली आहे. Systraने मात्र या त्रुटीसाठी आपली जबाबदारी नसल्याचे सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान, AAIने ओव्हरहेड उपकरणांसाठी आवश्यक अतिरिक्त उंचीला अद्याप परवानगी दिलेली नाही.

मेट्रो ७ए मार्गिका आधीच अनेक वेळा मुदत चुकल्याने चर्चेत आहे. हा प्रकल्प मूळतः २०२१ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे त्याला विलंब झाला आहे. सध्याच्या तांत्रिक अडचणीमुळे हा मार्ग २०२६-२७ या आर्थिक वर्षातही सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे वृत्त आहे.

या प्रकरणामुळे केवळ प्रकल्पाच्या वेळापत्रकावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले नाही, तर सार्वजनिक पैशांच्या वापराबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जवळपास ₹२५० कोटींचे काम पुन्हा करावे लागल्यास त्याचा अतिरिक्त आर्थिक भार कोणावर पडणार, तसेच या नियोजनातील त्रुटीची जबाबदारी कोणाची, हे महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत.

मेट्रो ७ए पूर्ण झाल्यानंतर अंधेरी पूर्वेकडून विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. मात्र आता तांत्रिक चूक, वाढता खर्च आणि विलंबाच्या तिहेरी कोंडीत हा प्रकल्प अडकला आहे.

दहीहंडी निमित्त अंधेरी-घाटकोपर लिंक रोड ५ सप्टेंबरला बंद
दहीहंडी निमित्त अंधेरी-घाटकोपर लिंक रोड ५ सप्टेंबरला बंद
अंधेरी–घाटकोपर मार्गावर पीक अवर्समध्ये अधिक फेऱ्या
अंधेरी–घाटकोपर मार्गावर पीक अवर्समध्ये अधिक फेऱ्या
मुंबई मेट्रोचे पहिले स्लीप पॉड्स असलेले कॅप्सूल हॉटेल अंधेरी पश्चिम मेट्रो स्टेशनवर होणार सुरू
मुंबई मेट्रोचे पहिले स्लीप पॉड्स असलेले कॅप्सूल हॉटेल अंधेरी पश्चिम मेट्रो स्टेशनवर होणार सुरू

Economy

About Us

MY ANDHERI NEWS is a trusted source for the latest news, analysis, and insights in the world of newspapers and magazines. Our team of experienced journalists and industry experts deliver in-depth, unbiased reporting that helps our readers stay informed and make well-informed decisions.

Trusted News and Information

At MY ANDHERI NEWS, we are committed to providing our readers with high-quality, fact-based journalism. Our content is rigorously researched and vetted to ensure accuracy and reliability. Whether you’re interested in the latest industry trends, market analysis, or thought-provoking commentary, you can count on MY ANDHERI NEWS to deliver the information you need.

Qtq70fmfjpeg 29 1024x1024

Meet Our Talented Team

Behind the scenes at MY ANDHERI NEWS, you’ll find a team of dedicated professionals who are passionate about their craft. Led by Editor-in-Chief Pramod Sawant, our writers, editors, and researchers work tirelessly to uncover the stories that matter most to our audience. With a wealth of experience and a deep understanding of the newspaper and magazine industry, our team is uniquely positioned to provide you with the insights you need to stay ahead of the curve.

Qtq70fmfjpeg 30 1024x1024

Stay Connected with MY ANDHERI NEWS

Whether you’re a regular reader or a newcomer to our publication, we invite you to stay connected with MY ANDHERI NEWS. Follow us on social media or visit our website regularly to access the latest news, analysis, and expert commentary. If you have any questions or would like to learn more about our services, feel free to reach out to us at myandherinews@gmail.com or pramodsawantpr@myandherinews. We’re always here to support you and help you stay informed.

Qtq70fmfjpeg 4 1024x1024

Latest News

अंधेरीतील अनधिकृत बांधकामांना उच्च न्यायालयाचा दणका

मालमत्ता मालकाला ₹१० लाखांचा दंड मुंबई : अंधेरी पश्चिम येथील सुमारे ३४ हजार चौरस फूट जागेवर परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या बांधकामांना संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या…

₹२५० कोटींचा मेट्रो प्रकल्प अडचणीत

चूक दुरुस्त न झाल्यास जवळपास १ किमीचा उन्नतमार्ग पाडावा लागण्याची शक्यता मुंबई : मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीवर दिलासा देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या मेट्रो ७ए प्रकल्पासमोर मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.…

अंधेरीत 70 वर्षांच्या वृद्धावर दारू पिऊन वाहन चालविण्याचा आरोप

प्रत्यक्षात स्ट्रोक आल्याचे झाले निदान मुंबई : अंधेरीतील ७० वर्षीय व्यक्तीवर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात संबंधित व्यक्ती मद्याच्या नशेत नसून त्यांना स्ट्रोक…

अंधेरीत शिंदेंच्या शिवसेनेचा जेन जी सोबत युवा संवाद

तरुणांशी संवाद साधत शिंदेंची नवी रणनीती मुंबई : पारंपरिक राजकीय सभा आणि भाषणांपलीकडे जाऊन तरुण मतदारांशी थेट संवाद साधण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने अंधेरी पूर्व येथे ‘मिशन…

अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भाडेवाढीचा मुंबई सिटी एफसीला फटका

संघाला मुंबईबाहेर सामने खेळवावे लागू शकतात मुंबई : इंडियन सुपर लीगमधील (ISL) मुंबई सिटी एफसी संघासमोर आगामी हंगामापूर्वी मोठी अडचण निर्माण झाली आहे. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील मुंबई फुटबॉल एरिनाच्या भाड्यात…