WhatsApp Image 2026 02 26 At 15.31.59

विरार : विवा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी युवा संसद वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील नोंदणीकृत युवकांचा यात सहभाग राहणार आहे.

विकसित भारत जिल्हास्तरीय युवा संसद वकृत्व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय हा ‘आणीबाणीची ५० वर्षे : भारतीय लोकशाहीसाठीचे धडे’ हा असून सहभागी स्पर्धक इंग्रजी, हिंदी किंवा मराठी भाषेत आपले मत मांडू शकतात. जिल्हास्तरावर उत्तीर्ण झालेले उत्तम ०५ विजेते राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरले जातील. विधानसभा मुंबई येथे त्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहील. राज्यस्तरीय पातळीवरील विजेते स्पर्धक हे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसद वकृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होतील.

युवा संसद वकृत्व ही माय भारत, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या द्वारे संयुक्त विद्यमाने राबवली जाणारी एक वकृत्व स्पर्धा आहे. यंदा या स्पर्धेचे आयोजक विवा महाविद्यालय आहे. या स्पर्धेत वय वर्षे १८-२५ वयोगटातील तरुण सहभागी होऊ शकतात.

या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून विवा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे,नेहरू युवा भारत जिल्हा पालघर येथील युवा अधिकारी मनीषा शर्मा, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. दीपा दळवी, विभाग समन्वयक कोमल पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी युवा संसद कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, संस्थेचे खजिनदार शिखर ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य संजय पिंगुळकर, संजीव पाटील, एस.एन पाध्ये, महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उप प्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. मधुरा सुर्वे, यांच्या सह आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

One thought on “विवा महाविद्यालयात विकसित भारत युवा संसद वकृत्व स्पर्धेचे आयोजन”

Comments are closed.