कॅफे sifarish

अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

अंधेरी- अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) खराब दर्जा असलेल्या हॉटेल विरोधात मोहीम उघडली आहे. मंगळवारी एफडीएने मुंबईतील 6 हॉटेल्सवर धाड टाकत त्यांचा परवाना रद्द केला आहे. यामध्ये मरोळ येथील कॅफे सिफारिशचा समावेश आहे.

मंगळवारी एफडीएच्या पथकाने मरोळच्या कॅफे सिफारिश अचानक धाड टाकली. यावेळी एफडीएच्या निरीक्षकांना सदर कॅफे मध्ये तापमान-नियंत्रण आणि साठवणुकीची अपुरी सुविधा, कीटक प्रतिबंधाची खराब व्यवस्था, अस्वच्छ उपकरणे आणि कामगारांसाठी हात धुण्याची, शौचालयाची व कपडे बदलण्याची अपुरी सुविधा आढळून आली.

cafe sifarish

या कारणामुळे एफडीएने कॅफे सिफारिशचा परवाना निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा, स्वच्छता, साठवणूक आणि तापमान-नियंत्रण मानकांचे पालन निश्चित करण्यासाठीच्या तीव्र तपासणी मोहिमेचा हा एक भाग असल्याचे एफडीएने म्हटले आहे. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ आणि संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कायद्यानुसार कारवाई केली जात आहे, असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे.

cafe sifarish 1

छायाचित्र सौजन्य: फ्री प्रेस जर्नल आणि जस्ट डायल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *