Mumbai Police Event

मुंबई, दि. २६: मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.

HCEE5REbcAADY1o Scaled

नरिमन पॉईंट येथील मुरली देवरा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आज या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

WhatsApp Image 2026 02 26 At 11.51.41 AM 1

कार्यक्रमाला गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.

WhatsApp Image 2026 02 26 At 11.51.37 AM

या वाहनांमध्ये ६५७ दुचाकी ६३३ चार चाकी वाहनांचा समावेश आहे. चार चाकी वाहनांमध्ये स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया वाहने आहेत. सध्या मुंबई पोलिसांचा हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीचा प्रतिसाद वेळ ५.३० मिनिटे आहे. हा प्रतिसाद वेळ या वाहनांच्या समावेशामुळे निश्चितच आणखी कमी होणार आहे. गुन्ह्याची जलद गतीने उकल करून पीडितांना तातडीने न्याय देणे या वाहनांमुळे शक्य होणार आहे.

WhatsApp Image 2026 02 26 At 11.51.40 AM

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत एकूण ९० पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. या प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच दुचाकी, चार स्कॉर्पिओ आणि मोठे अर्मेनिया वाहन एक अशाप्रकारे एकूण दहा वाहने देण्यात येणार आहेत. ही चार चाकी वाहने मोबाईल डाटा टर्मिनल, जीपीएस यंत्रणा, व्हेईकल ट्रेकिंग यंत्रणा आदी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत.

HCEE5RJawAAb5Au