सध्या कोरोना या रोगाने संपूर्ण जगावर हाहाकार माजवलेला आहे. आपल्या देशात देखील कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारद्वारे योग्य ती काळजी घेतली जाते. त्यामुळे सरकारच्या कामकाजाला थोडा हातभार म्हणून शिवसेना पक्षातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या संकटात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास पर्यायी रक्त पेढी मध्ये रक्त उपलब्ध असावे. त्यामुळे सरकारच्या आव्हानानंतर वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले आहे.
शनिवार दिनांक २७ जुन, २०२० रोजी मरोळ मधील होस्ट इन मरोळ नाका येथे शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून व आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मरोळ शाखाप्रमुख बिपीन शिंदे व युवा शाखा अधिकारी किरण पुजारी यांच्या तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या कालावधी दरम्यान नागरिकांना रक्तदान करता येणार होते. रक्तदान करण्यासाठी लाखो नागरिकांनी आपली पसंती दर्शवली होती. मरोळ चे माझी नगरसेवक प्रमोद सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित होते.