दादर – ‘जमलेल्या माझ्या….’ हा राज ठाकरेंचा (Raj Thackeray) आवाज या विधानसभा निवडणुकीत(Maharashtra assembly election 2024) शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर गरजणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्क येथे १७ नोव्हेंबर रोजी होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. या सभेला परवानगी न मिळाल्याने सभा रद्द करण्यात आली. याबाबत स्वत:राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
राज ठाकरे म्हणाले की, ”मुंबईतील सभेसाठी अजूनही परवानगी मिळाली नाही. राजकारण आहे की नाही माहीत नाही आणि दीड दिवसांत सभेसाठी तयारी करणे शक्य नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवरील सभा आम्ही करणार नाही.”
राज ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील सभेची मनसैनिक (Maharashtra Navnirman Sena) मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. सभा रद्द केल्याने त्यांचा हिरमोड झाला. मात्र इतर सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.