विरार : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या वतीने देण्यात येणारा ‘आधुनिक सावित्री पुरस्कार 2025’ विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण बारामती येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय सांसद अधिवेशनात करण्यात आले.
विरारच्या विवा महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांना ‘आधुनिक सावित्री पुरस्कार 2025’ ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार डॉ . रेखा रायकर ( मेंबर फायनान्स लँड पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारा वेळी डॉ . महामुनी ( प्राचार्य, शारदाबाई पवार महिला विद्यालय), डॉ.पी.वी. रसाळ,महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे मान्यवर उपस्थित होते.
डॉ. दीपा वर्मा ह्या करिअर कट्टा पालघर शहर जिल्हा समन्वयक तसेच आयक्यूएससी प्रमुख आहेत. करिअर कट्टा अंतर्गत आता पर्यंत वेगवेगळ्या विषयांवर राज्यस्तरीय अधिवेशन, रस्ता सुरक्षा उपक्रम, महिला सक्षमीकरण, कोकण कन्या उपक्रम यांसारख्या अनेक उपक्रमाचे यशस्वीरीत्या नियोजन त्यांनी केले आहे.
या पुरस्कारांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार आणि आधुनिक युगातील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला आहे.
आधुनिक युगात महाविद्यालयातील विद्यार्थिनींना त्यांच्या उज्वल करिअरसाठी व भविष्यकालीन प्रगतीसाठी आवश्यक असणारी गुण कौशल्य आत्मसात करण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य डॉ. दीपा वर्मा करत आहेत.
या अधिवेशनाला विवा विद्यालयातील प्राध्यापिका ओमकारी पोतदार तसेच महाविद्यालयातील करिअर कट्टा संघाचे विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. दीपा वर्मा यांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या वतीने देण्यात येणारा ‘आधुनिक सावित्री पुरस्कार 2025 मिळाल्या बद्दल विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्रजी ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, प्राचार्य डॉ. वी.श.अडीगल, उप प्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे यांनी शुभेच्छा दिल्या.