May 19, 2024

राजभवनात रंगला “मधुरव : बोरू ते ब्लॉग’चा खास प्रयोग

मुंबई- मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, त्यातल्या गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी,गायन ,नृत्य, नाट्य,अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण असलेला कार्यक्रम म्हणजे “मधुरव – बोरू ते ब्लॉग”.मराठी भाषेच्या जन्माची २००० वर्षांची संगीतमय कहाणी सांगणाऱ्या या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख तसेच अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत राजभवन येथे संपन्न झाला.

अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम, निर्माते अभिजित साटम व डॉ समीरा गुजर यांच्या पुढाकाराने आयोजित या नाट्यप्रयोगाला सुप्रसिद्ध ज्येष्ठ कलाकार शिवाजी साटम, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर यांच्यासह दिगदर्शक आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, राजेश मापुस्कर, अभिनेत्री वंदना गुप्ते, सोनाली खरे, रसिका सुनील संगीतकार कौशल इनामदार, गायक मिलिंद इंगळे यांच्यासह अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक, मान्यवर व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.