May 5, 2024

‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाच्या पोस्टरचं राज ठाकरेंनी केलं प्रकाशन

मुंबई- १० फेब्रुवारीला आपल्या भेटीला येणार आहे ‘आलंय माझ्या राशीला’ हा चित्रपट. मराठी सिनेसृष्टीच्या अनेक दिग्ग्ज कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. चित्रपटाच्या वेगळया विषयाचे कौतुक करीत राज ठाकरे यांनी चित्रपटाला खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी चित्रपटातील अभिनेत्री निर्मिती सावंत, निर्माते आनंद पिंपळकर, सहनिर्माते दिलीप जाधव, युवा अभिनेता प्रणव पिंपळकर, दिग्दर्शक अजित शिरोळे उपस्थित होते.

‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर‌, सिद्धार्थ खिरीड यांच्या भूमिका आहेत. अभिनेता प्रणव पिंपळकर या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करतोय