May 19, 2024

मुंबईकरांनो वापरा पाणी जपून

मुंबई : मुंबई शहरातील मोठ्या भागात सोमवारी सकाळपासून २४ तास पाणीपुरवठा होणार नाही. 30 आणि 31 जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या 12 वॉर्डातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईच्या मोठ्या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला जोडणाऱ्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे महानगरपालिका करणार आहे.

प्रभावित क्षेत्रे: पश्चिम उपनगर

के-पूर्व – विलेपार्ले पूर्व, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व

के-पश्चिम -अंधेरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम, जुहू),

पी-दक्षिण – गोरेगाव, आरे कॉलनी

पी-उत्तर – मालाड पूर्व आणि पश्चिम

आर-दक्षिण कांदिवली, चारकोप, पोईसर

आर-मध्य – बोरिवली, गोराई, मागाठाणे

आर-उत्तर – दहिसर, मंडपेश्वर

एच-पूर्व – वांद्रे पूर्व, खार पूर्व, सांताक्रूझ पूर्व

एच-पश्चिम – वांद्रे पश्चिम, खार पश्चिम, सांताक्रूझ पश्चिम

पूर्व उपनगर एस- विक्रोळी, भांडुप

एन – घाटकोपर, विद्याविहार

एल – कुर्ला, चुनाभट्टी

जी-उत्तर आणि जी-दक्षिण वॉर्डातील माहीम, दादर (प.), प्रभादेवी आणि माटुंगा (प) या भागांना 25 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. धारावीमध्ये 30 जानेवारीला दुपारी 4 ते रात्री 9 आणि 31 जानेवारीला सकाळी 4 ते 9 या वेळेत पाणीपुरवठा होणार नाही. या भागात 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत फक्त कमी दाबाचा पुरवठा असेल.