May 5, 2024

अंधेरीत पीएस फाऊंडेशन तर्फे चालता फिरता मोफत दवाखाना सुरू

अंधेरी- अंधेरी पूर्व विधानसभेत पीएस फाऊंडेशन तर्फे चालता फिरता मोफत दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या आरोग्यसेवेद्वारे डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केली जाते. गरजू रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येते.

दररोज अंधेरी पूर्व मधील 3 प्रभागांमध्ये ही गाडी जाते. प्रत्येक प्रभागामध्ये 3 तास थांबून दिवसाला 200 रुग्णांची तपासणी करण्यात येते. एका महिन्यात अंदाजे 5400 वर रुग्णांची मोफत तपासणी या सेवेद्वारे करण्यात आली आहे.

पीएस फाऊंडेशनच्या या आरोग्यसेवे मुळे वंचित, गरजू, आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. ना रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज आणि नाही महागड्या वैद्यकीय तपासणीची आवश्यकता. मोफत तपासणी आणि औषधे मिळत असल्याने अंधेरी भागात पीएस फाऊंडेशनच्या या आरोग्यसेवेची सध्या चर्चा आहे.

पीएस फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप शर्मा स्वतः या तपासणीवेळी उपस्थित होते. त्यांनी रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या.