May 19, 2024

अभिनेत्री दीप्ती लेलेचा २०२३ चा संकल्प : दर्जेदार पुस्तके वाचण्याचा !

मुंबई/प्रतिनिधी : बघता बघता कडू-गोड आठवणींनी भरलेलं २०२२ वर्ष कापरासारखं उडून गेलं. नव्या आशा, नवीन उत्साह घेऊन २०२३ आलंय.. नवीन वर्ष समरसून जगण्यासाठी संकल्प केले जातात. तर अभिनेत्री दीप्ती लेलेनेही एक संकल्प सोडलाय… नवीन वर्षात दर्जेदार पुस्तकं वाचण्याचा संकल्प सोडत तिने सर्वांना २०२३ च्या शुभेच्छा दिल्या आहेत..

आपल्या नवीन संकल्पाविषयी दीप्ती सांगते, “२०२३ मध्ये दर्जेदार पुस्तके वाचण्याचा संकल्प सोडलाय. खरं तर हा संकल्प २०२२मध्ये केला होता. पण तो काही केल्या पूर्ण झाला नाही. पण २०२३ मध्ये तो अगदी नेमाने आणि नेटाने तयार करणार आहे. त्याची सुरुवातही केलीय.. माझे आवडते लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांचं उमा कुलकर्णींनी अनुवादित केलेलं पारखा पुस्तक वाचून. ते पुस्तक वाचून पूर्णही झालंय. अशीच दर्जेदार पुस्तकं वाचून २०२३ हे वर्ष आनंदात साजरं करणार आहे. “

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दीप्ती म्हणाली, “सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा…देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो… तुम्हाला जे हवे ते सगळे मिळो… नवीन वर्ष तुम्हाला सुख-समाधानाचं… भरभराटीचे आणि आरोग्यदायी तसेच मानसिक शांतीचे जावो..”