जोगेश्वरी – मुंबईमध्ये सोमवारी दिवसा ढवळ्या भर रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा(Burning car) थरार अनुभवयास मिळाला. जोगेश्वरी(Jogeshwari) परिसरात चालत्या कारने अचानक पेट घेतला. पुलाच्या मध्यभागी गाडीने पेट घेतल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांना पुलावरून जाणे कठीण झाले होते.
मात्र, दुचाकी मात्र कसरत काढत पुढे जात होत्या. आगीचे कारण समजू शकलेले नाही. अपघाताच्या व्हिडिओवरून ही बीएमडब्ल्यू (BMW) कार असल्याचे दिसते.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. गाडीमध्ये एकूण किती लोक होते याचीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गाडी प्रचंड जळत आहे आणि त्यामागील वाहने तेथून कसा तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. गाडीचा दरवाजा उघडा असल्याने वाहनातील लोक स्वत:ला वाचवण्यासाठी बाहेर पडले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.