अंधेरी- गोखले पुलाच्या (Gokhale Bridge) अनुभवानंतर, वाहतूक पोलिस आता ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यापूर्वी मुंबई महापालिका (BMC) निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास वचनबद्ध आहे याची खात्री करत आहेत.
मनपाच्या अधिकाऱ्यांनी मिड-डेला सांगितले की, “वाहतूक पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्रसाठी प्रकल्प तपशील जमा करताना, आम्ही प्रकल्पाच्या कालावधीबद्दल माहिती देतो. पूर्वी, वाहतूक पोलिस घटनास्थळावरील वाहतूक परिस्थितीचा आढावा घेऊन आणि वळवण्याचा आराखडा तयार केल्यानंतर प्रमाणपत्र देत असत. आता, ते विशेषतः प्रकल्पाच्या टाइमलाइनबद्दल विचारत आहेत.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “आम्हाला रहदारीच्या समस्या समजतात, परंतु प्रकल्पादरम्यान आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, कारण मुंबईत अनेक कामे सुरू आहेत. अतिक्रमण हटवण्यासारख्या समस्यांमुळे जमिनीच्या पातळीवर अडथळे निर्माण होतात.”
अनिल कुंभारे, सह पोलिस आयुक्त म्हणाले, “आम्ही महापालिकेस त्यांनी दिलेल्या निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास सांगत आहोत.”
अंधेरी गोखले पूल आणि विक्रोळी पूर्व-पश्चिम जोड प्रकल्प हे सर्वाधिक विलंबित प्रकल्प आहेत. गोखले पूल, मूलत: 2022 च्या अखेरीस पूर्ण करण्याचे नियोजित होते, आता ते मे 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सुरुवातीला 2018 मध्ये काम सुरू झाले आणि 2022 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख होती. रेल्वे रुळांवर पुलाचा भाग बांधण्याचे काम पश्चिम रेल्वेला देण्यात आले होते. तथापि, संपूर्ण प्रकल्प नंतर महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला, मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
गोखले पुलाबद्दल अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही प्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर वेळेत पूर्ण करण्याचे काम केले आहे. पुलाच्या एका भागावर दुतर्फा वाहतूक सुरू झाली आहे”.
वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी नमूद केले की गोखले पूल प्रकल्पातील विलंबाने वाहतूक व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण झाली, विशेषतः पावसाळ्यात जेव्हा अंधेरी सबवे पाणी साचल्यामुळे वारंवार बंद होतो. त्यामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे(Western express highway), इस्टर्न एक्स्प्रेस हायवे(Eastern express highway) आणि विलेपार्ले(Vileparle) आणि जोगेश्वरी(Jogeshwari)तील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती.
दरम्यान गोखले पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा ही इच्छा अंधेरीकरांसह संपूर्ण मुंबईकरांची आहे.