विरार: ओडिसा येथे पार पडलेल्या ७ व्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स फाउंडेशन ( रजि ) आयोजित राष्ट्रीय मास्टर जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रतीक चव्हाण याने घवघवीत यश मिळवले. या यशाच्या जोरावर मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ०६ ते ०९ मार्च २०२५ दरम्यान झाल्या.
या स्पर्धेमध्ये प्रतीक प्रकाश चव्हाण यांनी पुरुष गटातील २०० मीटर फ्रीस्टाईल – सोलो मध्ये सुवर्णपदक व १०० मीटर फ्रीस्टाईल सोलो मध्ये रजतपदक पटकावले आहे. तसेच पुरुष ४०० मीटर हर्डल सोलो सादरीकरणात रजत पदक, मेन्स रीले 4*400 मीटर रनिंग टीम सादरीकरण मध्ये रजतपदक प्राप्त केले. वरील सारे पदक प्रतीक चव्हाण यांना सिबा प्रसाद मिश्रा (जनरल सेक्रेटरी मास्टर्स गेम्स फेडरेशन, ओडिसा) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
प्रतीक यांनी स्पर्धेत मिळविलेल्या घवघवीत यशामुळे त्यांना महाराष्ट्र रीले संघाचे कॅप्टन पद भूषवण्याचा बहुमान मिळाला.
प्रतीक चव्हाण हे मूळचे विरारचे रहिवासी असून विवा महाविद्यालय येथे प्राणीशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. या स्पर्धेवेळी हेमंत कोने (जॉईन सेक्रेटरी , मास्टर्स गेम्स असोसिएशन) , बाळा चव्हाण ( जनरल सेक्रेटरी , मास्टर्स गेम्स असोसिएशन) मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर प्रतीक यांची मलेशिया – श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धेसाठी निवड केली गेली आहे.
प्रतीक यांनी पटकवलेल्या पदकांमुळे विवा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष हितेंद्रजी ठाकूर यांनी भावी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर या सर्व प्रवासात गुरू – आप्तेष्ट, नातेवाईक, सहकारी प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले