May 19, 2024

मरोळ सुक्या मासळी बाजारातून दीड लाख रुपये किमतीचे सुके बोंबील गेले चोरीला

अंधेरी- सुक्या मासळींचा बाजार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मरोळ मासळी बाजारातून(Marol dry fish market) 1.5 लाख रुपये किमतीचे सुक्या बोंबलाचा मोठा साठा चोरीला गेला आहे. अंधेरी कुर्ला मार्गावरील(Andheri Kurka Road) मरोळ पाईप लाईन (Marol Pipe Line) शेजारी हा बाजार भरतो. निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व्यापारी येथे सुकी मासळी घेण्यासाठी येथे येतात.

मरोळ मासळी बाजारमधील ३३ वर्षीय मासे विक्रेत्या आरती बारिया यांनी ६९६ किलो सुका बोंबिल(Bombay duck fish) मासळीचा साठा चोरीला गेल्याची माहिती अंधेरी पोलिसांना दिली. बारिया यांनी गुजरातमधून सुकी मासळी मागवून मरोळ मासळी मार्केटमध्ये साठा केला होता. सुक्या मासळीच्या साठ्याची चोरी 18 डिसेंबरला झाल्याची तिच्या निदर्शनास आली.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “सुकवलेले बोंबील बारियाने तागाच्या पोत्यात भरून मरोळ मासळी बाजारातील रूपाली बावसकर यांच्या गाडीत 7 दिवसांच्या भाडेतत्वावर ठेवले होते. 18 डिसेंबरला बावसकरांनी बारियाला मासळी बाजारात तात्काळ बोलावून घेतले. बाजारात पोहोचल्यावर बोंबालाच्या 15 गोण्या गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बारियाने त्या भागात चुकून इतरत्र गोण्या डिलिव्हरी झाली की नाही हे देखील तपासले पण त्यांना माशांचा साठा सापडला नाही. शेवटी बारिया यांनी तिने अंधेरी पोलिसांकडे (Andheri Police Station) जाऊन २५ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला, असे मिड डेच्या वृत्तात म्हटले आहे.