MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS

आमदार मुरजी पटेल यांनी विधानसभा अधिवेशनात मांडला अंधेरी पूर्वेतील वाहतूक कोंडीचा मुद्दा

मुंबई: संपूर्ण मुंबईत वाहतूक कोंडी(Mumbai Traffic) ही मोठी समस्या बनली आहे. अंधेरी पूर्व (Andheri East) भागात देखील प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याच संदर्भातील प्रश्न स्थानिक आमदार मुरजी पटेल (MLA Murji Patel) यांनी नुकताच विधानसभेत उपस्थित केला.

विधानसभेत (Legislative assembly) प्रश्न मांडताना शिवसेना आमदार मुरजी पटेल म्हणाले की, अंधेरी पूर्वेतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. ती सोडवण्यासाठी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. विशेषत: 12 डीपी रस्ते बंद झाल्यामुळे वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत.

पटेल यांनी सरकारला विनंती करताना सांगितले की, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) आणि मुंबई महानगरपालिका(BMC) या दोन प्रमुख प्राधिकरणांनी निश्चित वेळापत्रक सादर केले पाहिजे. हा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने सरकारने अधिकृतपणे वेळेची हमी द्यावी.

तसेच हा प्रकल्प प्रशासकीय प्रक्रियेत अडकणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने द्यावेत. ही समस्या केवळ वाहतुकीसाठीच नाही तर आपत्कालीन सेवांमध्येही एक गंभीर अडथळा बनली आहे. रुग्णवाहिका वेळेवर येत नाहीत. अग्निशमन दल(Mumbai Fire Brigade) उशिरा पोहोचते. नागरिकांचा दैनंदिन प्रवास देखील काही तासांनी वाढला आहे.

मरोळ ते अंधेरी स्थानकापर्यंत असणारा अवघ्या काही मिनिटांचा प्रवास आता तासांवर गेला आहे. मंत्री महोदयांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत महत्त्वाचे निर्णय घेतले.

या कामात 12 डीपी रस्त्यांवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, एसआरए अंतर्गत मंजूर एकूण 550 पुनर्वसन घरे, मंजूर 100 घरे, उर्वरित वर्षभरात टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार असून, अंमलबजावणीसाठी ठराविक मुदतीत काम पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आणि एसआरए विभागाला देण्यात आले आहेत.

शिवसेना आमदार मुरजी पटेल म्हणाले की, महायुती सरकारने या वाहतूक कोंडीच्या समस्येची तातडीने दखल घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल अंधेरीतील नागरिकांच्या वतीने शासनाचे आभार व्यक्त करतो.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *