अंधेरी- 166 अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मुरजी पटेल(MLA Muraji Patel) यांनी रविवारी विधीमंडळात विधानसभा(Vidhansabha) सदस्यत्वाची शपथ घेतली. आमदार मुरजी पटेल यांनी मराठी भाषेतून ईश्वराला साक्ष ठेवून शपथ घेतली.
शिवसेनेचे(Shivsena) मुरजी पटेल (काका) यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Election)अंधेरी पूर्व (Andheri east) मतदारसंघात त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे)(Shivsena UBT) ऋतुजा रमेश लटके (Rutuja Ramesh Latke)यांचा 25,486 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला. मुरजी पटेल यांना 94,010 मते मिळाली तर ऋतुजा रमेश लटके यांना 68,524 मते मिळाली.
मुरजी पटेल हे माजी नगरसेवक आहेत जे पूर्वी भाजपमध्ये (BJP) होते आणि अलीकडेच त्यांनी पक्ष बदलून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटात प्रवेश केला. 2019 मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून रमेश लटके यांच्याकडून पराभूत झाले होते. महाराष्ट्रातील(Maharashtra) 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या लटके यांनी मुरजी पटेल (काका) यांचा 16,965 मतांनी पराभव केला. 2022 च्या पोटनिवडणुकीत, भाजपने पटेल यांना उमेदवारी दिली होती परंतु पक्षाने नंतर त्यांची उमेदवारी मागे घेतली आणि रुतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
पतीच्या आकस्मिक निधनानंतर 2022 च्या पोटनिवडणुकीत रुतुजा लटके यांनी शिवसेनेच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती. रमेश लटके यांनी यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये ही जागा जिंकली होती, 2009 मध्ये काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
मुरजी पटेल यांच्याविरुद्ध 2017 च्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवताना निवडणूक समितीकडे बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप पटेल यांच्यावर होता.