अंधेरी- नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यातर्फे दरवर्षी अंधेरी मध्ये रक्तदान शिबिराचे (Blood donation camp) आयोजन केले जाते. यावेळी रविवार, 5 जानेवारी 2025 रोजी अंधेरीतील(Andheri) गोविंदवाडी सेवा केंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत हे शिबीर सुरू असेल. रक्तदानामुळे अनेक जीवांचे प्राण वाचतात त्यामुळे रक्तदान महान दान समजले जाते.
रक्तदान अभावी अनेक रुग्णालयांत रक्ताचा तुटवडा भासतो. हा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे. गरजूंना रक्त मिळावे, कोणाचा तरी प्राण वाचावा म्हणून रक्तदात्यांनी शिबिरामध्ये रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.