MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS Politics

राज्यात 3 कोटी तर अंधेरीत 78 हजार लाडक्या बहिणींचं मतदान कोणाला?

अंधेरी- महाराष्ट्रात(Maharashtra) बुधवारी विधानसभा 2024(Assembly election 2024) साठी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. या निवडणुकीत 6,40,88,195 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यापैकी 3,06,49,318 महिला मतदार(Female Voters) होत्या. तर अंधेरी (Andheri) विधानसभा मतदार संघात 78,652 महिला मतदारांनी मतदान केले.

2019 मध्ये एकूण 2,53,90,647 महिला मतदारांनी मतदान केले होते. 2019 च्या तुलनेत हे प्रमाण 52,58,671 इतके जास्त आहे. लाडकी बहिण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

2019 मध्ये, मुंबई शहर(Mumbai) आणि उपनगरात अनुक्रमे 46.78 टक्के आणि 49.21 टक्के महिला मतदारांनी मतदान केले होते. या वेळी, ही टक्केवारी अनुक्रमे 6.64 आणि 7.53 टक्के वाढून मुंबई शहरात 53.42 टक्के आणि उपनगरात 56.74 टक्के इतकी झाली आहे.

महिला मतदार वाढल्याने सत्ताधारी महायुती(Mahayuti) सरकारच्या आशा उंचावल्या आहेत.

लाडकी बहिण योजनेने महायुतीच्या बाजूने काम केले आहे. योजना आणि इतर कल्याणकारी धोरणांमुळे महिला आनंदी आहेत. लाडकी बहिण योजना गेल्या सहा महिन्यांत कार्यान्वित झाली असून ती भविष्यातही सुरू राहणार आहे. अशी योजना यापूर्वी राज्यात कधीच राबवली गेली नव्हती. या योजनेमुळे, महिलांमध्ये अशी भावना आहे की त्यांच्याबद्दल विचार करणारे एक तरी सरकार आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने महिला सरकारच्या समर्थनार्थ मतदानासाठी बाहेर पडल्या आहेत,” असे शिवसेना(Shivsena) विधानपरिषद सदस्या मनीषा कायंदे यांनी सांगितल्याचे दी इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तांत म्हटले आहे.

या लाडक्या बहीणींनी महायुतीच्या की महाआघाडीच्या भावांना मत दिले हे उद्या स्पष्ट होईल.

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान पुढील प्रमाणे :