Rd 1

अंधेरी- सेव्हन हिल्स इस्पितळ(Seven Hills Hospital) ते कदमवाडी मार्ग(Kadamwadi Marg) या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची स्थानिक आमदार मुरजी पटेल(MLA Murji Patel) यांनी गुरुवारी पाहणी केली. महापालिका(BMC) अधिकाऱ्यांकडून त्यांनी कामाचा आढावा घेतला. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काम वेगाने करण्याच्या सूचना आमदार पटेल यांनी मनपा अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

वाहतुकीच्या दृष्टीने अंधेरी(Andheri) विभाग हा सर्वांत वाईट समजला जातो ते येथील ट्रॅफिक मुळे. अंधेरी -कुर्ला रोड(Andheri Kurla Road) वर नेहमीच रहदारीची प्रचंड समस्या जाणवते. मात्र अंधेरीच्या मरोळमधील रहिवाशांना आता रहदारीच्या समस्येपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. सेव्हन हिल्स इस्पितळ ते कदमवाडी मार्ग या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कार्य सध्या प्रगतीपथावर आहे.

RD2 Scaledरस्ता रुंदीकरणाचे काम चांगले सुरू आहे. एकदा ते पूर्ण झाले की, दैनंदिन वाहतूक सुरळीत होईल, गर्दी कमी होईल आणि परिसराचा अधिक नियोजनबद्ध विकास होईल, असे मुरजी पटेल एक्स या आपल्या समाज माध्यमवर म्हटले.

RD3 Scaledयाप्रसंगी भाजप नेते उमेश राणे देखील उपस्थित होते. त्यांनी रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या स्थानिक रहिवाशांच्या समस्या आमदार पटेल यांच्यासमोर मांडल्या.