MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS Social

अंधेरीमध्ये पी एस फाऊंडेशनचा `खेळ खेळू पैठणीचा’ संपन्न

दहावीतील गुणवंतांचा देखील गौरव

अंधेरी- पी एस फाऊंडेशनच्या(PS Foundation) वतीने अंधेरी(Andheri), शांतीनगर मधील महिलांसाठी ‘खेळ खेळू पैठणीचा’ या महिलांसाठी विशेष खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळाची मानाची पैठणी साडी सरिता गुप्ता या महिलेने जिंकली. पी एस फाऊंडेशनचे संस्थापक प्रदीप शर्मा व अध्यक्षा स्वीकृती प्रदीप शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.      

सदर कार्यक्रमाचे आयोजन पी एस फाउंडेशनचे सदस्य सचिन सदानंद गावकर यांनी केले होते. या कार्यक्रमात 100 हून अधिक महिलांनी भाग घेतला होता. यावेळी 30 लकी ड्रॉ काढण्यात आले. लकी ड्रॉ विजेत्या महिलांना कूलर, मिक्सर, कुकर, इस्त्री अशी विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

याच कार्यक्रमात दहावी मध्ये 80 टक्क्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात आले. शर्वरी सुर्वे (90.80%), श्रावणी पावसकर (90.60%), आरुष गुप्ता (87%), सायींका जाधव (87%), प्राप्ती नाईक(86.2%), वेदान्त कोपर्डे (83%), आयुष साळुंखे (83%), भावेश तावडे (82%), शुभम पांचाळ(81%), तिथी जैन (80%) आदी गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.      

”प्रत्येक घरातील गृहिणी आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी दिवस रात्र राबते. तिला स्वतःसाठी वेळ देता येत नाही. तिचे कुटुंबाप्रति, समाजाप्रति जे मोठे योगदान आहे त्या योगदानास कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम प्रदीप शर्मा आणि स्वीकृती शर्मा यांच्या सहकार्याशिवाय शक्य झाला नसता,” अशी प्रतिक्रिया आयोजक सचिन सदानंद गावकर यांनी दिली.      

कार्यक्रमास पी एस फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतीनगर विभागातील महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.