मुंबई – शिक्षणतज्ज्ञ सोनिया मेयर्स, हाऊस ऑफ कलामच्या एपीजेएमजे सलीम शेख यांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे राष्ट्र उभारणी आणि उत्कृष्टतेच्या भावनेचे प्रतीक असलेल्या प्रतिष्ठित डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्कार सोहळा पार पडला. मरोळ विभागातील सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.
इम्रान शेख हे जाहिरात, कार्यक्रम व्यवस्थापन आणि आयात-निर्यात या क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक वर्षे कार्यरत आहेत. नई उमंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि आओ मुस्कुराये चॅरिटेबल ट्रस्टचे ते विश्वस्त आहेत. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कोविड-१९ संकटादरम्यान हजारो लोकांना महत्त्वपूर्ण मदत केली. ५००० हून अधिक रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. विविध रुग्णालये, स्वयंसेवी संस्था आणि जामा मस्जिद अहले-हदीस, मरोल आणि एसडीएसएमएम सारख्या संस्थांसोबत ते संलग्न आहेत. गणेशोत्सव, दुर्गा पूजा आणि ईद-ए-मिलाद सारख्या उत्सवांचे आयोजन करून समाजात सामाजिक सौहार्द जपण्याचे महत्कार्य ते करत आहेत. मरोळमधील विविध समाजात शांती, सदभावना जपावी यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून इम्रान शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.