Enviornment Day

अंधेरी- जागतिक पर्यावरण दिनाचे(World Environment Day ) औचित्य साधून अंधेरीचे(Andheri) आमदार मुरजी पटेल(MLA Murji Patel) यांनी आरे ठाकूर डेअरी येथे वृक्षारोपण केले. श्री गणेश तलाव चॅरिटेबल ट्रस्ट व श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब तर्फे हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

”एक झाड लावणे म्हणजे पुढील अनेक पिढ्यांचे संरक्षण करणे होय. पुढील पिढ्यांना चांगलं पर्यावरण देणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी एकतरी झाड लावले पाहिजे,” असे मत आमदार मुरजी पटेल यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे जनतेला जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

WhatsApp Image 2025 06 05 At 14.12.071या कार्यक्रमास भाजप नेते उमेश राणे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी देखील यावेळी वृक्षारोपण केले. ”वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरी हा संदेश संत तुकाराम यांनी आपणास दिला. ही झाडे, जंगले, निसर्ग आपले कुटुंब, नातेवाईक आहेत. त्यांचा आपण प्रेमाने सांभाळ केला पाहिजे. आपली संस्कृती आपल्याला हीच शिकवण देते,” असे उमेश राणे यांनी म्हटले.

WhatsApp Image 2025 06 05 At 14.12.07या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी व पर्यावरणस्नेही तसेच शाळकरी विद्यार्थी व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.