मरोळ – बांग्लादेशात (Bangladesh)सत्तान्तर झाल्यानंतर तेथील हिंदू धर्मियांवर(Hindu) अत्याचारांचे प्रमाण वाढलेले आहे. मंगळवारी मरोळ(Marol) मध्ये सकल हिंदू समाजातर्फे बांग्लादेशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्या, महिलांवरील बलात्कार, हिंदू मंदिरांवरील हल्ले या अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.
मरोळ नाका सिग्नल, जलाराम मंदिर चौक, सेवन हिल्स इस्पितळ(Seven Hills Hospital) चौक, विजयनगर चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS), विश्व हिंदू परिषद(VHP), बजरंग दल(Bajrang Dal), भाजप(BJP) व अन्य हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या. शेकडो महिला- पुरुष, तरुण वर्ग सहभागी झाले होते.
आज मुस्लिम बहुसंख्यांक बांगलादेशात हिंदू बांधवांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहे. महिलांवर दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत. मंदिरांची विटंबना केली जात आहे. उघडपणे मानवी हक्कांची पायमल्ली केली जात आहे. अशा या अत्याचारी बांग्लादेशावर जगातील इतर देशांनी बहिष्कार टाकावा. तसेच बांग्लादेशातील हिंदू बांधवांनी स्वतःला दुर्बल व निराधार समजू नये. भारतातील 80 कोटी हिंदू समाज आपल्या बांधवांसोबत आहे ही भारतीयांची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी देशभर आंदोलन सुरू असल्याचे, भाजपचे अंधेरी विभागाचे महामंत्री उमेश राणे यांनी सांगितले.
भारतात घुसलेले बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर हाकलावे, बांगलादेश सरकारवर दबाव बनवावा, बांगलादेशी अल्प संख्यांक हिंदू, बौद्ध यांचे रक्षण करावे ही मागणी घेऊन सकल हिंदू समाजा तर्फे संपूर्ण देशभर आंदोलन करण्यात येत आहेत. आज मानवाधिकारादिना निमित्त हिंदूंना ही मानवाधिकार अंतर्गत न्याय मिळावा अशी मागणी या निदर्शनात करण्यात आली.