MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS

पाणी नसल्याने अंधेरी, धारावी, वांद्रे परिसरातील हजारो नागरिक त्रस्त

मुंबई: मंगळवारी सकाळी पवई(Powai) येथील तानसा(Tansa Pipe Line burst) जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती झाली. परिणामी, दुरुस्तीचे काम करण्यासाठी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला.

एस-भांडुप(BMC S ward ), के पूर्व – जोगेश्वरी(BMC K east ward) आणि अंधेरी पूर्व, जी उत्तर(BMC G North ward) – दादर, माहीम, धारावी आणि एच पूर्व (BMC H ward) – सांताक्रूझ, खार, वांद्रे पूर्व या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. बुधवारपर्यंत पाणीपुरवठा सामान्य होण्याची अपेक्षा आहे.

मंगळवारी पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) पुलाजवळ १,४५० मिमी व्यासाची तानसा तलावातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. तानसा जलवाहिनीमधून होणारा पाणीपुरवठा तात्काळ थांबवण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या(BMC) जल अभियंता विभागाने आपत्कालीन दुरुस्तीचे काम सुरू केले.

गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाणीपुरवठ्यातील विस्कळीततेमुळे महानगरपालिकेच्या चारही विभागामधील रहिवाशांना त्रास झाला, अचानक पाणीपुरवठा थांबल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पवई आसपासच्या भागात, विशेषतः चाळींमध्ये, घरांमध्ये पाणी शिरले.

महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “पुढील अपव्यय टाळण्यासाठी झडपा तात्काळ बंद करण्यात आल्या आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. तथापि, दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी किमान २४ तास लागतील.”

दुरुस्तीच्या कामात पवई ते मरोशीपर्यंतची मुख्य पाण्याची पाईपलाईन वेगळे करणे समाविष्ट आहे. या प्रक्रियेचा के पूर्व वॉर्ड, एस वॉर्ड, जी उत्तर वॉर्ड आणि एच पूर्व वॉर्डमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. या काळात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

खालील विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झालेला आहे :

एस विभाग : गौतम नगर, जय भीम नगर, बेस्ट नगर, फिल्टर पाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे रोड, मिलिंद नगर, एल अँड टी परिसर.

के पूर्व विभाग : ओम नगर, सहार गाव, जेबी नगर, लेलेवाडी, मरोळ पाइपलाइन, कदमवाडी, शिवाजी नगर, सेव्हन हिल्स हॉस्पिटल एरिया, चिमटपाडा, टाकपाडा, सागबाग, तरुण भारत, चकाला, कबीर नगर, बामनवाडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)

जी उत्तर: धारावी.

एच पूर्व: बेहरामपाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *