विरार: ५ व्या महाराष्ट्र मास्टर्स गेम्स असोसिएशन( रजि ) आयोजित “मास्टर्स गेम्स नाशिक २०२४ ” अंतर्गत नाशिक येथे दिनांक १४ व २५ डिसेंबर २०२४ रोजी राज्यस्तरीय मास्टर जलतरण स्पर्धा आयोजित केल्या होत्या. ही स्पर्धा मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे पार पडली.
या स्पर्धेमध्ये प्रतीक प्रकाश चव्हाण याने १०० मीटर फ्री स्टाईल मध्ये सुवर्णपदक व ५० मीटर फ्री स्टाईल मध्ये कांस्यपदक पटकावले आहे. प्रतिक चव्हाण हा मूळचा विरारचा रहिवासी असून पेशाने प्राणीशास्त्र विषयाचा सहाय्यक प्राध्यापक देखील आहे.
या स्पर्धे वेळी हेमंत कोने (जॉईन सेक्रेटरी , मास्टर्स गेम्स असोसिएशन) , बाळा चव्हाण ( जनरल सेक्रेटरी , मास्टर्स गेम्स असोसिएशन) मान्यवर उपस्थित होते. प्रतिक याने पटकावलेल्या पदकांमुळे आप्तेष्ट नातेवाईक ,सहकारी प्राध्यापक वर्ग यांनी भावी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.